S M L

भारत-पाक मॅचवर 10 हजार कोटींचा सट्टा

सट्ट्याच्या बाजारात भारताचं पारडं जड असल्याचं समजतं आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2017 02:10 PM IST

भारत-पाक मॅचवर 10 हजार कोटींचा सट्टा

18 जून : आजच्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यावर तब्बल 10 हजार कोटींचा सट्टा लागणार असल्याची माहिती बुकींनी दिलीय. आतापर्यंत 4 ते 5 हजारांचा सट्टा लागला असून सामना सुरू झाल्यानंतर हा आकडा चांगलाच वाढेल, अशी बुकींची माहिती आहे. सट्ट्याच्या बाजारात भारताचं पारडं जड असल्याचं समजतं आहे.

बुकींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यात भारत जिंकला तर 1 रुपयाचा सट्टा लावणाऱ्याला दीड रुपये मिळणार आहेत. तर पाकिस्तान जिंकला तर 1 रुपयाचा सट्टा लावणाऱ्यास 3 रुपये मिळणार आहेत.

तर या सामन्यात नाणेफेक भारतानं जिंकल्यास 1 रुपयाचा सट्टा लावणाऱ्याला 1 रुपये 72 पैसे मिळतील. तर पाकिस्ताननं टॉस जिंकल्यास 1 रुपयाचा सट्टा लवाणाऱ्याला 2 रुपये 33 पैसे मिळतील.

या शिवाय कर्णधार विराट कोहली आणि अझर आलीवरही सट्टेबाजांचं विशेष लक्ष आहे. उद्याच्या सामन्यात विराट कोहलीनं सर्वाधिक धावा केल्यास 1 रुपयामागे 2 रुपये 33 पैसे मिळणार आहेत. तर अझर अलीनं सर्वाधिक धावा केल्यास 3 रुपये 85 पैसे मिळणार आहेत.यासोबतच रोहित शर्मानं सर्वाधिक धावा केल्यास 1 रुपयामागे 3 रुपये 89 पैसे मिळणार आहेत. तर शोएब मलिकनं सर्वाधिक धावा केल्यास 1 रुपयामागे 3 रुपये 93 पैसे मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2017 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close