S M L

Champions Trophy 2017 Final, India vs Pakistan : भारत vs पाक महामुकाबल्याचं संपूर्ण कव्हरेज

LIVE : भारत -पाक महामुकाबल्याबद्दल प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या एकाच पेजवर

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2017 10:24 PM IST

Champions Trophy 2017 Final, India vs Pakistan : भारत vs पाक महामुकाबल्याचं संपूर्ण कव्हरेज

Highlight

Jun 18, 2017

 • 21:40(IST)

  कानपूरमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचे पोस्टर जाळले

 • 21:28(IST)

  भारताची 10 वी विकेट, बुमरा 1 रन करून आऊट

    

 • 21:27(IST)

   पाकिस्तानचा शानदार विजय, तब्बल 180 रन्सने भारताचा केला पराभव
  http://bit.ly/2rJoGi6 

 • 21:19(IST)

  ...आणि ऋषी कपूर यांनी केलं पाकिस्तानच्या टीमचं अभिनंदन

 • 21:14(IST)

  भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, भारताचा स्कोअर 156/8 (28 ओव्हरर्स)

 • 21:09(IST)

  भारताचा स्कोअर 154/7 (27.0)

 • 21:07(IST)

  अन् जडेजा माघारी परतला, हार्दिक पांड्याचा नाहक बळी

 • 21:05(IST)

  भारताला मोठा झटका, हार्दिक पांड्या रनआऊट
  http://bit.ly/2rJoGi6 

 • 21:03(IST)

  हार्दिक पांड्याचे सलग 2 सिक्स, भारताचा स्कोअर 152/6 (26.0)

 • 21:00(IST)

  भारतचा स्कोअर 25 ओव्हरनंतर 137/6

 • 20:53(IST)

  हार्दिक पांड्याची सिक्सची हॅटट्रिक,  एकापाठोपाठ 3 सिक्स आणि एक चौकार
   

 • 20:51(IST)

  हार्दिक पांड्याचे एकापाठोपाठ 2 सिक्स

 • 20:47(IST)

  21 ओव्हरर्समध्ये भारताचे 100 रन्स पूर्ण 


  #IndVsPakराडा #INDvPAK #CT17

 • 20:44(IST)

  भारताचा स्कोअऱ 93/6 (20.0)

 • 20:39(IST)

  भारताचे शेर झाले ढेर, भारताचा स्कोअर 89/6 (19.0)

19 जून : चॅम्पिन्स ट्राॅफीच्या इतिहासात तब्बल 8 वर्षांनंतर अखेर पाकिस्तानला मौका मिळालाच. पाकिस्तानने भारताला पराभूत करत पहिल्यांच चॅम्पियन्स ट्रॅाफीवर नाव कोरलंय. पाकने टीम इंडियाचा तब्बल 180 रन्सने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला.

पाकिस्तानने भारतासमोर उभा केलेला 339 धावांचा डोंगर टीम इंडिया सर करण्यात सपेशल अपयशी ठरली. मोठ्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली टीम इंडियाचे शेर ढेर झाले. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा भोपळाही न फोडता आऊट झाला. त्यापाठोपाठ कॅप्टन विराट कोहली 5 रन्स करून आऊट झाला. शिखर धवन आणि युवराजने टीम इंडियाची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण, शिखर धवन 21 रन्स करून आऊट झाला. भारताची स्थिती 33 वर 3 विकेट अशी होती.

त्यानंतर धोणी आणि युवराजने फटकेबाजी करत स्कोअर बोर्ड हलता ठेवला. पण युवराजही 22 रन्स करून आऊट झाला. युवराज पाठोपाठ धोणीही 4 रन्स करून माघारी परतला. टीम इंडियाच्या भरवश्याचे 5 ही हे फलंदाज कोणताही मोठा स्कोअर न करता माघारी परतले. केदार जाधवही 9 रन्स करून स्वस्तात आऊट झाला.

तेव्हा भारताचा स्कोअर होता 72 वर 6 बाद...अशा परिस्थिती हार्दिक पांड्या धावून आला. तडाखेबाज फलंदाजी करत त्याने 43 चेंडूत 76 रन्स ठोकले. यात सहा सिक्स आणि 4 चौकारांचा समावेश आहे. हार्दिक पांड्याचा झंझावत पाहता भारतीय चाहत्यांमध्ये आशा निर्माण झाली. पण, रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे पांड्याचा नाहक बळी गेला. जडेजाने रन घेण्यासाठी धाव घेतली आणि लगेच माघार पण तोपर्यंत पांड्या रनसाठी पुढे आला होता.  पांड्या रनआऊट झाल्यानंतर टीम इंडियावर पराभवाचे ढग जमा झाले.

152 रन्स वर 7 विकेट अशी टीमची अवस्था झाली. त्यानंतर जडेजाही 15 रन्सवर आऊट झाला आणि टीम इंडियाचा खेळ खल्लास झाला. पत्याच्या बंगल्याप्रमाणे टीम इंडियाचा डाव गडगडला. पाककडून मोहम्मद आमिरने रोहित, शिखर धवन आणि विराटची विकेट घेऊन टीम इंडियाला धक्का दिला. तर हसन अलीने 3 विकेट आणि शादाब खानने 2 विकेट घेतल्यात.

पाकिस्तानची इनिंग

भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगचं आमंत्रण दिलं. पाकिस्तानची सुरुवात शानदार राहिली. अजहर अली आणि फखर जमानने भारतीय गोलंदाजी चांगलीच धुलाई केली.

125 रन्सपर्यंत पाकची एकही विकेट गेली नाही. भारताचे भरवश्याचे गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि आर.अश्विनच्या ओव्हरर्स सगळ्यात महागड्या ठरल्यात. आर.आश्विनने 10 ओव्हर्समध्ये 70 रन्स दिले. तर जसप्रीत बुमराने 9 ओव्हर्समध्ये 68 रन्स दिले. विकेट पडत नसल्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचे ढग जमा झाले होते. मात्र, 59 रन्सवर जसप्रीत बुमराने अजहर अलीला आऊट करून पहिलं यश मिळवून दिलं. पण त्यानंतर फखरची फटकेबाजी सुरूच होती. 106 बाॅल्समध्ये त्याने 114 रन्स केले. यात 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे.

बाबर आझमने फखरची चांगली साथ दिली. अखेर 34 व्या ओव्हरमध्ये फखर आऊट झाला. फखर आऊट झाल्यानंतर स्कोअर आटोक्यात येईल अशी शक्यता होती. पण असं झालं नाही बाबर आझमने फटकेबाजी करत 46 रन्स केले आणि आपल्या टीमला 250 पार नेलं. त्यापुर्वी शोयब मलिक 12 रन्सवर स्वस्तात आऊट झाला.

बाबर आऊट झाल्यानंतर मोहम्मद हाफीजने तडाखेबाज बॅटिंग करत अर्धशतक पूर्ण केलं. 57 रन्सची नाबाद खेळी करत आपल्या टीमला 300 चा टप्पा पार करून दिला. त्याला इमाद वसीमने चांगली साथ दिली. त्यानेही 21 बाॅल्समध्ये 25 रन्स केले. भारतीय गोलंदाज पाक टीमला रोखण्यास अपयशी ठरले. त्यामुळे पाकने 338 रन्सचा टप्पा गाठला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2017 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close