S M L

कोलंबो कसोटीत भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि 53 धावांनी विजय मिळवला.

Sonali Deshpande | Updated On: Aug 6, 2017 03:44 PM IST

कोलंबो कसोटीत भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

कोलंबो, 6 आॅगस्ट : रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत  श्रीलंकेवर एक डाव आणि 53 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

रवींद्र जाडेजा मॅन ऑफ द मॅच बनला. फलंदाजीमध्ये पुजारा आणि रहाणेची शतके आणि गोलंदाजीमध्ये पहिल्या डावात अश्विन आणि दुसऱ्या डावात जडेजाने केलेली भेदक गोलंदाजी हे भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर सलामीवीर उपुल थरंगा (2) लगेच बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डावही अडचणीत येईल असे वाटत होते. पण करुणारत्ने आणि मेंडीसने श्रीलंकेचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी 191 धावांची भागीदारी केली.  दुस-या डावात श्रीलंकेकडून कुसल मेंडीसने (110) शानदार शतक झळकवले. सलामीवर करुणारत्ने (92) धावांवर नाबाद राहिला होता.

तिसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेच्या दोन बाद 209 धावा झाल्या होत्या. भारताने आपला पहिला डाव 9 बाद 622 धावांवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 183 धावात आटोपला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2017 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close