S M L

आता भारतातच बनणार फायटर प्लेन्स

आता सरकार भारतातच फायटर प्लेन्स बनवणार आहेत. त्यासाठी टाटा ग्रुपनं लॉकहिड मार्टिनशी तसा करार केलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 21, 2017 12:58 PM IST

आता भारतातच बनणार फायटर प्लेन्स

21 जून: आतापर्यंत भारताला संरक्षण क्षेत्रासाठी पुर्णपणे विदेशांवर अवलंबून रहावं लागत होतं.पण यापुढे असं होणार नाही.आता सरकार भारतातच फायटर प्लेन्स बनवणार आहेत. त्यासाठी टाटा ग्रुपनं लॉकहिड मार्टिनशी तसा करार केलाय.

24जूनला पंतप्रधान मोदी अमेरिकेला जाणार आहेत. पण जायच्या आधी अमेरिकेकडून 11 फायटर विमानं विकत घ्यायचा करार त्यांनी रद्द केलाय.आता देशातच फायटर विमानं बनणं शक्य होईल. भारतातच विमानं बनवावी म्हणून टेक्सासच्या 'लॉकहिड मार्टिन'शी 'टाटा'नं करार केलाय. यामुळे भारतात विमानं तर बनतीलच पण त्यासोबतच आयातीवरचा खर्चही कमी होईल.आणि फायटर प्लेन्स बनवण्याचे कारखाने भारतातच उभारल्यामुळे भारतात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत.

तसंच सध्या ट्रम्पनं एच1बी1 व्हिजावर निर्बंध घातल्यामुळे भारतातून अमेरिकाला आयटीसाठी जाणाऱ्या लोकांचा ओघ भलेही कमी झाला असेल पण या करारानंतर टेक्सासच्या लॉकहिड मार्टिनमध्ये अनेक रोजागाराच्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे टेक्सासला जाण्याचा ओघ मात्र नक्कीच वाढणार आहे.

चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रू देशांमुळे भारताला दरवर्षी नवी हत्यारं घ्यावी लागतात ,संरक्षणावरचा खर्च वाढवावा लागतो .म्हणून हा करार भारताला अत्यंत फलदायी ठरू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close