S M L
  • राज ठाकरेंच्या कुंचल्यातून

    Published On: Feb 2, 2013 10:52 AM IST | Updated On: May 17, 2013 02:40 PM IST

    02 फेब्रुवारीपुण्यात पहिलंवहिलं व्यंगचित्रकार संमेलन शुक्रवारपासून सुरू झालंय. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या संमेलनाचं उद्घाटन झालं. राज्यभरातले व्यंगचित्रकार या संमेलनासाठी उपस्थित आहेत. 92 व्या वर्षी आर के लक्ष्मण यांनी काढलेलं कॉमनमॅनचं व्यंगचित्र आणि राज ठाकरे यांनी काढलेल्या बाळासाहेबांच्या व्यंगचित्राने उपस्थितांची वाहवा मिळवली. यासोबतच व्यंगचित्रं कसं काढायची याची प्रात्यक्षिकंही खुद्द व्यंगचित्रकारांकडून शिकायला मिळणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात तब्बल 7 दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. परिसंवाद, गप्पा अशा कार्यक्रमांची मेजवानी संमेलनात आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close