S M L
  • थरार मुंगी घाटाचा

    Published On: Apr 25, 2013 11:39 AM IST | Updated On: May 15, 2013 01:32 PM IST

    25 एप्रिलसातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेच्या निमित्तानं महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी राज्यातले लाखो भाविक मुंगी घाटातून कावडीतून पाणी घेऊन जातात. ऐन उन्हाळ्यात केवळ श्रध्देपोटी हे भाविक हा खडतर घाट पार करतात. कोथळे गावातून हे गावकरी महादेवाचा गजर करत प्रस्थान करतात. या घाटाचे तीन टप्पे आहेत आणि घाट चढायला साधारणत: दोन तास लागतात. पायात चप्पल किंवा बूट नसतात. त्यांच्या साथीला असतात डफाचा ताल, यामध्ये महिला किंवा लहान मुलंही मागे नसतात. यावेळेला महादेवाकडे मात्र सगळ्यांनी देवा भरपूर पाऊस पडू दे...असंच मागणं मागितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close