S M L
  • 'यांचा महाराष्ट्र आणि त्यांचा महाराष्ट्र'

    Published On: Apr 30, 2013 05:38 PM IST | Updated On: May 15, 2013 01:20 PM IST

    एकीकडे प्रगतीशील महाराष्ट्र वेगानं घोडदौड करतंय दुसरीकडे याच महाराष्ट्रात कमालीचं दारिद्र्य आहे. याच विसंगतीवर अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं एक कविता लिहिलीय. 'यांचा महाराष्ट्र आणि त्यांचा महाराष्ट्र' ही कविता...सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रात एक यांचाही महाराष्ट्र आहे आणि एक त्यांचाही महारारष्ट्र आहे दोघांचाही वर्धापन दिन मात्र एकच आहे, हे SEZच्या सुरक्षित कोटात ते नक्षलवाद्यांच्या वेढ्यातहे आयपीएलच्या ग्राऊंडवर ते भर उन्हात, दगड खाणीतहे मॉल्समध्ये फिरताना ते रेशनच्या रांगेतहे बंगल्यातल्या स्विमिंग पुलात ते हंडा घेऊन टँकर मागेहे इथे असताना ते तिथे असतातयांची बायको कंपनीची डायरेक्टर त्यांची बायको बीपीएल बचत गटातयांचा सोनू इंटरनॅशनल स्कूलात त्यांचं कार्ट आश्रमशाळेतत्यांची बबली स्क्रीन टेस्ट देताना त्यांची पोरगी लावणीच्या फडातयांचे वृद्ध डॅडी सत्संगात त्यांचा म्हातारा बाप दिंडीतयांचे कुटुंबाचे असे आहेत्यांचे कुटुंब तसे आहेहे नेटवर चॅट करताना त्यांच्या गावातही नसते पोस्ट हे पंचतारांकित उपचार घेताना त्यांच्या दवाखान्यात नसतो डॉक्टरहे देशोदेशी हवाई फिरताना ते बघतात मजुरीचा रोज नवा गावइकडे एक्सप्रेस हायवे सी लिंक तिकडे वाहून जातो रस्ताइकडे असे असतानातिकडे तसे असतेहे वाळू तस्कर होताना ते वाळू उपसायला असतातहे बिल्डर होताना ते वीट भट्टीवर आयुष्य भाजून घेतातहे साखर सम्राट होताना ते ऊस तोडीत आयुष्य तोडून घेतातहे दारू सम्राट होताना ते सारी मजुरी दारुवर उधळतातहे शैक्षणिक मॉल्स उभारताना त्यांची निरक्षर पोरं तिथं मजुरीवर जातातहे एनजीओ चालवताना त्यांची आयुष्य फंडिंगसाठी कोरी चेक होतातहे असे होतानाते तसे होतातइकडे रोज घरकुळ घोटाळे तिकडे उघड्यावर झोपणारे भटकेइकडे 6 महिन्यांची बाळंत रजा तिकडे ओली बाळंतीण मजुरीवरइकडे आयपीएलला करमाफी तिकडे कर्जवसुलीच्या आत्महत्याइकडे वेतन आयोग आणि पेंशन तिकडे जन्मभर कष्ट आणि म्हातारपणी टेंशनयांच्यासाठी असे असताना त्यांच्यासाठी तसे असतेयांचे असेच चालणार आहेत्यांचे तसेच चालणार आहेमहाराष्ट्र दिनाच्या रोशनाईत त्यांचे लोडशेडिंग विसरुयाफटक्यांच्या आवाजात त्यांच्या किंकाळ्या विरुद्यायांच्या सेन्सेक्सच्या अपमध्ये त्यांच्या डाऊन हिमोग्लोबिनची चर्चा कशालायांचा महाराष्ट्र असा आहेत्यांचा महाराष्ट्र तसा आहेएक महाराष्ट्र यांचा आहेएक महाराष्ट्र त्यांचा आहेदोघांचाही वर्धापनदिन मात्र एकच आहेगरिबांना रिसवणार्‍या श्रीमंत महाराष्ट्रा हॅपी बर्थ डे टू यूहॅपी बर्थ डे माय महाराष्ट्राहॅपी बर्थ डे माय महाराष्ट्रा

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close