S M L
  • क्रिकेटचा देव सोन्याच्या नाण्यावर !

    Published On: May 13, 2013 12:15 PM IST | Updated On: May 14, 2013 01:27 PM IST

    मुंबई 13 मे :अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर लोक महालक्ष्मीचं नाणं खरेदी करतात. आपल्या क्रिकेटवेड्या देशात सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानणार्‍या लोकांची संख्या कमी नाही. अशाच सचिनला दैवत मानणार्‍या क्रिकेट प्रेमींसाठी मास्टर ब्लास्टर सचिनचं सोन्याचं नाणं बाजारात आलंय. खुद्द सचिननंच आज या नाण्याचं अनावरण केलं. मुंबईत ट्रायडेंन्ड हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात या नाण्याचं अनावरण केलं. स्विस मेंन्ट, वॉलकाम्ब बी एसए कंपनीनं हे 10 ग्रॅमनं नाणं तयार केलंय. ही सर्व नाणी स्विझलँडमध्ये तयार करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close