S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • रेसकोर्सवर बाळासाहेबांच्या स्मारकाला पाठिंबा देऊ -उद्धव ठाकरे
  • रेसकोर्सवर बाळासाहेबांच्या स्मारकाला पाठिंबा देऊ -उद्धव ठाकरे

    Published On: May 13, 2013 12:39 PM IST | Updated On: May 14, 2013 01:26 PM IST

    मुंबई 13 मे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत शिवसेनेनं पुन्हा एकदा आग्रहाची मागणी केली आहे. यावेळी स्मारकासाठी जागा आहे ती मुंबईतील ह्रदयस्थनी असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्स. रेसकोर्सची साडे आठ लाख चौरस मीटर जागेचा गरीबांना काहीही उपयोग होत नाही, म्हणून तिथे बगीचा बांधावा अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेने आयुक्तांकडे केली आहे. 31 मे रोजी रेसकोर्सची लीज संपतेय. ही लीज न वाढवता तिथे गार्डन बनवा अशी मागणी महापौर सुनील प्रभूंनी केली आहे. या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक बनवण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे अशा स्वरूपाच्या बातम्यांवर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलीये. बाळासाहेबांच्या स्मारकाचा आमचा प्रस्ताव नाही. पण असा प्रस्ताव कुणी ठेवणार असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल अस उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close