S M L
  • उद्धव ठाकरेंची फक्त सदिच्छा भेट -भोसले

    Published On: May 17, 2013 12:26 PM IST | Updated On: May 17, 2013 12:26 PM IST

    मुंबई 17 मे : राष्ट्रवादीचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले नाराज असल्याची चर्चा आहे. त्यासाठीच त्यांच्या महायुतीच्या नेत्यांशी गाठीभेटी सुरू आहेत. सकाळी उदयनराजेंनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे मातोश्रीवर गेले होते. तसंच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचीदेखील उदयनराजे भेट घेणार आहेत. दरम्यान, उदयनराजे यांची नाराजी दूर करण्यासाठी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं उदयनराजे यांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close