S M L
  • श्रीसंतचे 'तारे' जमिनीवर !

    Published On: May 24, 2013 02:41 PM IST | Updated On: May 29, 2013 04:10 PM IST

    नवीन नायर, तिरुअनंतपुरमतिरुअनंतपुरम 24 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे पोस्टर बॉय एस. श्रीसंतची प्रतिमा चांगलीच डागाळली. या वादाचा ब्रँड श्रीसंतला चांगलाच फटका बसला आहे. शांताकुमारन श्रीसंत... केरळचा सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर...केरळ राज्य लॉटरीचा तो अम्बॅसिडर होता. पण, केरळ सरकारने हा करार आता रद्द केलाय. श्रीसंतला एका गुन्ह्यात आरोपी करण्यात आलंय. मग आम्ही काय करावं, म्हणून त्याला काढलंय असा खुलासा केरळचे अर्थमंत्री के. एम. मानी यांनी केला.श्रीसंत 2009 पर्यंत जाहिरात इंडस्ट्रीमध्ये फारच लोकप्रिय होता. पेप्सीच्या यंगिस्तान जाहिरातीत तो धोणी, सहवागसोबत झळकला. तर युवराज सिंगबरोबर पॅराशूटची जाहिरातही त्याने केली. पण, जाहिरातींच्या या झगमगत्या दुनियेची कवाडं लवकरच त्याच्यासाठी बंद झाली. केरळच्या मुथूट, माथेर यासारख्या उद्योजकांनीही श्रीसंतकडे पाठ फिरवली. इतकंच नाही तर ज्या मल्याळम सिनेमातून त्यानं पदार्पण केलं त्या सिनेमातली त्याच्यावर चित्रीत झालेली दृश्यंही कापण्यात आली. श्रीसंतला सिनेमातून काढताना मला दु:ख झालं. सुरुवातीला वाट पहावी, असं मला वाटलं. पण, लोकाना आता त्याच्यावर विश्वास राहिलेला नाही अशी माहिती सिनेमाच्या निर्मात्यांनी दिली.पण, या पडत्या काळातही काही जणं श्रीसंतबरोबर होती. त्याच्या S36 एन्टरटेनमेंट कंपनीत भागीदार असलेले कोच शिवकुमार यांनी त्याची पाठराखण केलीय. श्रीसंत खरंतर अत्यंत गुणवान क्रिकेटर... पण, तापट स्वभाव आणि बेताल व्यक्तिमत्त्व, यामुळे त्याच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागलाय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close