S M L
  • ल्होत्से शिखरावर 'तो' सुवर्णक्षण

    Published On: May 27, 2013 05:03 PM IST | Updated On: May 29, 2013 04:09 PM IST

    27 मे : पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या 8 गिर्यारोहकांनी गेल्यावर्षी एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं. यंदाही या संस्थेच्या सदस्यांनी एव्हरेस्ट बरोबर ल्होत्से हे शिखर सर केलंय. हे गिर्यारोहक उद्या पुण्यात दाखल होत आहेत. बुधवारी शनिवार वाड्यावर या गिर्यारोहकांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट आणि ल्होत्से यावर तिरंगा फडकवला. ल्होत्से या शिखरावर अखेरचा सुवर्णक्षण कॅमेर्‍यात कैद करण्यात आला. ल्होत्से शिखर एव्हरेस्टच्या शेजारीच दक्षिण बाजूला आहे. एव्हरेस्टला जगभरातील गिर्यारोहक पसंती देत असताना, ल्होत्से हे शिखर मात्र काहीसे दुर्लक्षित आहे. हे शिखरही एव्हरेस्टप्रमाणेच 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंच आहे. मात्र, ते एव्हरेस्टपेक्षा 332 मीटर कमी आहे. अजित ताटे हे गिर्यारोहक आशिषबरोबर होते. तसंच लाकपा दिर्जी आणि पासंग शेर्पा हे शेर्पाही होते. गिरीप्रेमी या संस्थेच्या वतीन एव्हरेस्ट-ल्होत्से या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. उमेश झिरपे हे या मोहिमेचा ग्रुप लीडर होते. त्यांच्या ग्रुप मध्ये गणेश मोरे, आनंद माळी, भूषण गर्गे, आशीष माने, टेकराज अधिकारी आणि अजित ताटे यांचा सहभाग होता. या मोहिमेच्या माध्यमातून आशिषनं हा पराक्रम केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close