S M L

चीनची लडाखमध्ये घुसखोरी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 28, 2014 04:17 PM IST

चीनची लडाखमध्ये घुसखोरी

28  जुलै : लडाखच्या डेमचॉक भागात चिनी लष्कराने घुसखोरी केल्याची माहिती मिळाली आहे. इथल्या भटक्या लोकांचे तंबू उद्‌ध्वस्त करून चिनी सैन्याने इथे स्वत:चे तंबू ठोकले आहेत. भारत आणि चीनमध्ये सीमावाद असल्यामुळे या भागात अशा घटना वारंवार घडतायत. चीनचे पंतप्रधान शि जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेत चर्चा झाली. तेव्हा आपलं सरकार सीमावादावर तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहे, असं आश्वासन शि जिनपिंग यांनी दिलं होतं. पण तरीही चिनी लष्कराने लडाखमध्ये घुसखोरी करण्याची घटना घडल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2014 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close