S M L

अशी होते अमेरिकेची निवडणूक

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2016 02:43 PM IST

अशी होते अमेरिकेची निवडणूक

 

06 नोव्हेंबर : अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक आता शिगेला पोहोचली आहे. दोनच दिवसांत अमेरिकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळणार आहे. नेमकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी असते त्याचा हा आढावा...

अमेरिकेमधल्या 50 राज्यांमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होतं. मतदार डेमोक्रॅटिक, रिपब्लिकन अशा पक्षांपैकी एक पर्याय निवडतात. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी मतदार प्रत्यक्ष मतदान करत नाहीत. राष्ट्राध्यक्षांची निवड त्या त्या राज्यांतले इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य करतात.

या सदस्यांना इलेक्टर्स असं म्हणतात. मतदारांनी दिलेल्या मतांचा कौल बघून हे इलेक्टर्स राष्ट्राध्यक्षांची निवड करतात. इलेक्टर्सनी केलेल्या मतदानात बहुमत मिळवलेला उमेदवार राष्ट्राध्यक्ष बनतो. राष्ट्राध्यक्षपदाच्या बहुमतासाठी 270 मतं आवश्यक आहेत. 270 मतं मिळवणा•या उमेदवाराची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2016 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close