S M L

पाक-इराणमध्ये भूंकप, 61 ठार

16 एप्रिलपाकिस्तान आणि इराणच्या सीमेवर तीव्र क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के पाकिस्तान, मध्य-पूर्व आशिया आणि उत्तर भारतातही जाणवले आहेत. भारतात दिल्ली, नोएडा, जयपूर आणि अरूणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता ही 7.8 रिश्टर स्केल इतकी होती. पाकिस्तानात या भूकंपाची तीव्रता अधिक होती, अशी माहिती मिळतीये. बलुचिस्तान प्रांतात भूकंपामुळे पाकिस्तानात 21 व्यक्तींचा मृत्यू झालाय. तर तिकडे इराणमध्ये या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. इराणमध्ये चाळीस लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झालाचं समजतंय. मात्र, इराणच्या अणुप्रकल्पाला या भूकंपामुळे कोणताही धोका पोहोचला नसल्याची महत्त्वपूर्ण माहितीदेखील मिळाली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 03:14 PM IST

पाक-इराणमध्ये भूंकप, 61 ठार

16 एप्रिल

पाकिस्तान आणि इराणच्या सीमेवर तीव्र क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के पाकिस्तान, मध्य-पूर्व आशिया आणि उत्तर भारतातही जाणवले आहेत. भारतात दिल्ली, नोएडा, जयपूर आणि अरूणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता ही 7.8 रिश्टर स्केल इतकी होती. पाकिस्तानात या भूकंपाची तीव्रता अधिक होती, अशी माहिती मिळतीये. बलुचिस्तान प्रांतात भूकंपामुळे पाकिस्तानात 21 व्यक्तींचा मृत्यू झालाय. तर तिकडे इराणमध्ये या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. इराणमध्ये चाळीस लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झालाचं समजतंय. मात्र, इराणच्या अणुप्रकल्पाला या भूकंपामुळे कोणताही धोका पोहोचला नसल्याची महत्त्वपूर्ण माहितीदेखील मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2013 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close