S M L

परवेझ मुशर्रफना अटक करण्याचे कोर्टाचे आदेश

18 एप्रिलपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. चक शहजाद या ठिकाणी असलेल्या मुशर्रफ यांच्या फार्महाऊसमध्येच त्यांना सध्या नजरकैदेत ठेवण्यात आलंय. इस्लामाबादमधल्या ट्रायल कोर्टाने मुशर्रफ यांच्या अटकेचे आदेश दिले आहे. अध्यक्षपदी असताना मुशर्रफ यांनी 2007 मध्ये आणीबाणी जाहीर करून 60 न्यायाधीशांची हकालपट्टी केली होती. त्याचसंदर्भात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आलंय. पण अटक करण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी त्यांना कोर्टाच्या बाहेर नेलं. अटकपूर्व जामीनासाठी मुशर्रफ यांनी अर्ज दाखल केला होता. पण तो कोर्टाने फेटाळला आणि त्यांच्या अटकेचे आदेश दिले. तसंच त्यांना एका दिवसाची मुदत दिली. त्यानंतर मुशर्रफ यांना त्यांच्यात फॉर्महाऊसवर नजरकैदेत ठेवण्यात आलंय. आता मुशर्रफ या आदेशाविरोधात हायकोर्टात जाणार आहेत. पाकिस्तानमध्ये पुढच्या महिन्यात निवडणुका होत आहे. त्यासाठी मुशर्रफ यांनी चार ठिकाणांहून निवडणूक अर्ज भरले होते. मात्र, चारही अर्ज गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगानं फेटाळले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 03:04 PM IST

परवेझ मुशर्रफना अटक करण्याचे कोर्टाचे आदेश

18 एप्रिल

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. चक शहजाद या ठिकाणी असलेल्या मुशर्रफ यांच्या फार्महाऊसमध्येच त्यांना सध्या नजरकैदेत ठेवण्यात आलंय. इस्लामाबादमधल्या ट्रायल कोर्टाने मुशर्रफ यांच्या अटकेचे आदेश दिले आहे. अध्यक्षपदी असताना मुशर्रफ यांनी 2007 मध्ये आणीबाणी जाहीर करून 60 न्यायाधीशांची हकालपट्टी केली होती. त्याचसंदर्भात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आलंय. पण अटक करण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी त्यांना कोर्टाच्या बाहेर नेलं. अटकपूर्व जामीनासाठी मुशर्रफ यांनी अर्ज दाखल केला होता. पण तो कोर्टाने फेटाळला आणि त्यांच्या अटकेचे आदेश दिले. तसंच त्यांना एका दिवसाची मुदत दिली. त्यानंतर मुशर्रफ यांना त्यांच्यात फॉर्महाऊसवर नजरकैदेत ठेवण्यात आलंय. आता मुशर्रफ या आदेशाविरोधात हायकोर्टात जाणार आहेत. पाकिस्तानमध्ये पुढच्या महिन्यात निवडणुका होत आहे. त्यासाठी मुशर्रफ यांनी चार ठिकाणांहून निवडणूक अर्ज भरले होते. मात्र, चारही अर्ज गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगानं फेटाळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2013 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close