S M L

परवेझ मुशर्रफ यांना अटक

19 एप्रिलइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना इस्लामाबादमधल्या ट्रायल कोर्टाने त्यांच्या फार्महाऊसमध्येच नदरैकेदेत ठेवलंय. आज सकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली आणि कोर्टात हजर केलं. मुशर्रफ यांच्या कोठडीची गरज नाही, त्यांना तुरुंगात पाठवा असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं. मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, मुशर्रफ यांना तुरुंगात पाठवू नये त्यांना फार्महाउसवरच नदरकैदेत ठेवण्यात यावं अशी विनंती त्यांच्या वकीलांनी केली. विशेष म्हणजे, देशाचे माजी सैन्यप्रमुख आणि माजी अध्यक्ष असलेल्या मुशर्रफ यांना हातकड्या घालून कोर्टात हजर करण्यात आलं नाही याबद्दल कोर्टाने पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. मुशर्रफ यांना सामान्य नागरिकाप्रमाणंच वागवण्यात यावं असं कोर्टाने पोलिसांना सुनावले. दरम्यान, पाकिस्तानच्या सैन्याला राजकारणात काहीही स्थान नसल्याचं मत मुशर्रफ यांचे प्रवक्ते रझा बुखारी यांनी व्यक्त केलंय. तर, मुशर्रफ यांना झालेली अटक म्हणजे दैवाचे फासे उलटे पडल्याचा प्रकार आहे अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केली. देशाची राज्यघटना पायदळी तुडवण्याच्या मुशर्रफ यांच्या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी असं शरीफ यांनी म्हटलं आहे.मुशर्रफ यांच्यावरील आरोप- 2006-07मध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना बेकायदेशीरपणे बंदीवान केले- बलुच नेते नवाब अकबर बुग्ती यांची हत्या- माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना अपुरी सुरक्षा पुरवलीमुशर्रफ यांच्यासमोरील आवाहन- पाकिस्तानात उत्साहात स्वागत नाही- मुशर्रफ यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे आणि कोर्टाची समन्स आहेत- तालिबानकडून मुशर्रफ यांच्या जीवाला धोका- मध्यमवर्गातही मुशर्रफना पाठिंबा नाही, इम्रान खान अधिक लोकप्रिय- PPP आणि PML(N) या दोन प्रमुख पक्षांशी कटू संबंधबदलाची वर्षे- मे 2013 - संसद आणि असेंब्लीच्या निवडणुका- सप्टेंबर 2013 - अध्यक्ष झरदारींचा कालावधी संपेल- ऑक्टोबर 2013 - जनरल कयानींचा कालावधी संपेल

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:26 PM IST

परवेझ मुशर्रफ यांना अटक

19 एप्रिल

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना इस्लामाबादमधल्या ट्रायल कोर्टाने त्यांच्या फार्महाऊसमध्येच नदरैकेदेत ठेवलंय. आज सकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली आणि कोर्टात हजर केलं. मुशर्रफ यांच्या कोठडीची गरज नाही, त्यांना तुरुंगात पाठवा असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं. मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, मुशर्रफ यांना तुरुंगात पाठवू नये त्यांना फार्महाउसवरच नदरकैदेत ठेवण्यात यावं अशी विनंती त्यांच्या वकीलांनी केली.

विशेष म्हणजे, देशाचे माजी सैन्यप्रमुख आणि माजी अध्यक्ष असलेल्या मुशर्रफ यांना हातकड्या घालून कोर्टात हजर करण्यात आलं नाही याबद्दल कोर्टाने पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. मुशर्रफ यांना सामान्य नागरिकाप्रमाणंच वागवण्यात यावं असं कोर्टाने पोलिसांना सुनावले. दरम्यान, पाकिस्तानच्या सैन्याला राजकारणात काहीही स्थान नसल्याचं मत मुशर्रफ यांचे प्रवक्ते रझा बुखारी यांनी व्यक्त केलंय. तर, मुशर्रफ यांना झालेली अटक म्हणजे दैवाचे फासे उलटे पडल्याचा प्रकार आहे अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केली. देशाची राज्यघटना पायदळी तुडवण्याच्या मुशर्रफ यांच्या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी असं शरीफ यांनी म्हटलं आहे.

मुशर्रफ यांच्यावरील आरोप- 2006-07मध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना बेकायदेशीरपणे बंदीवान केले- बलुच नेते नवाब अकबर बुग्ती यांची हत्या- माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना अपुरी सुरक्षा पुरवली

मुशर्रफ यांच्यासमोरील आवाहन- पाकिस्तानात उत्साहात स्वागत नाही- मुशर्रफ यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे आणि कोर्टाची समन्स आहेत- तालिबानकडून मुशर्रफ यांच्या जीवाला धोका- मध्यमवर्गातही मुशर्रफना पाठिंबा नाही, इम्रान खान अधिक लोकप्रिय- PPP आणि PML(N) या दोन प्रमुख पक्षांशी कटू संबंध

बदलाची वर्षे- मे 2013 - संसद आणि असेंब्लीच्या निवडणुका- सप्टेंबर 2013 - अध्यक्ष झरदारींचा कालावधी संपेल- ऑक्टोबर 2013 - जनरल कयानींचा कालावधी संपेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2013 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close