S M L

पाकिस्तानात मतदानादरम्यान बॉम्बस्फोट 10 जण ठार

कराची 11 मे : पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. नॅशनल ऍसेंब्लीच्या 342 जागांसाठी आणि 4 प्रांतिक असेंब्लीसाठी हे मतदान होतंय. पण या मतदानावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. मतदान सुरू असताना कराचीत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला. मतदान उधळून लावण्याची धमकी तालिबाननं दिलीय. पण ही धमकी झुगारून लाहोरमध्ये मात्र मतदारांनी रांगा लावल्यात. त्यामुळे इथं उच्चांकी मतदान होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातले 8 कोटी 50 लाख मतदार आज मतदानाचा हक्क बजावत आहे. यातले 4 कोटी मतदार पहिल्यांदाच मतदान करत आहेत.पाकिस्तान निवडणूक -2013नॅशनल असेंब्ली - 342 जागाएकूण उमेदवार - 4,670खुल्या जागा - 272महिलांसाठी राखीव - 60अल्पसंख्याक (मुस्लीम वगळता) - 10पंजाब असेंब्ली - 297 जागासिंध असेंब्ली - 130 जागाबलुचिस्तान असेंब्ली - 51 जागाखैबर पख्तुनख्वा असेंब्ली - 99 जागा

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 03:07 PM IST

पाकिस्तानात मतदानादरम्यान बॉम्बस्फोट 10 जण ठार

कराची 11 मे : पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. नॅशनल ऍसेंब्लीच्या 342 जागांसाठी आणि 4 प्रांतिक असेंब्लीसाठी हे मतदान होतंय. पण या मतदानावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. मतदान सुरू असताना कराचीत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला.

मतदान उधळून लावण्याची धमकी तालिबाननं दिलीय. पण ही धमकी झुगारून लाहोरमध्ये मात्र मतदारांनी रांगा लावल्यात. त्यामुळे इथं उच्चांकी मतदान होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातले 8 कोटी 50 लाख मतदार आज मतदानाचा हक्क बजावत आहे. यातले 4 कोटी मतदार पहिल्यांदाच मतदान करत आहेत.

पाकिस्तान निवडणूक -2013नॅशनल असेंब्ली - 342 जागाएकूण उमेदवार - 4,670खुल्या जागा - 272महिलांसाठी राखीव - 60अल्पसंख्याक (मुस्लीम वगळता) - 10

पंजाब असेंब्ली - 297 जागासिंध असेंब्ली - 130 जागाबलुचिस्तान असेंब्ली - 51 जागाखैबर पख्तुनख्वा असेंब्ली - 99 जागा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2013 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close