S M L

लादेन 9 वर्ष पाकमध्येच लपला होता !

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2013 05:47 PM IST

लादेन 9 वर्ष पाकमध्येच लपला होता !

osam bin laden09 जुलै : 09 जुलै : अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा खात्मा झाल्यानंतर 2 वर्षांनंतर त्यासंबंधीचा पाकिस्तानचा अहवाल फुटलाय. ओसामा तब्बल 9 वर्षे पाकिस्तानात असल्याचं या अहवालात मान्य करण्यात आलंय. मात्र त्यासाठी आयएसआयवर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही.

 

ओसामाचं अबोटाबादमधलं वास्तव्य म्हणजे आयएसआयचं निव्वळ दुर्लक्ष होतं, असं या अहवालात म्हटलंय. या अहवालानुसार, घर घेण्यासाठी पाकिस्तानच्या जमीन महसूल विभागाने नीट पडताळणी न करता ओसामाच्या कुटुंबीयांना परवानगी दिली होती असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. 2 मे 2011 रोजी अबोटाबादमध्ये अमेरिकेच्या सैनिकांनी लादेनला ठार मारलं होतं.

 

कोण होता ओसामा बिन लादेन ?

 

- 1957 मध्ये ओसामा बिन लादेनचा जन्म सौदी अरेबियात झाला. बांधकाम क्षेत्रातील मातब्बर अब्जाधीश मोहम्मद बिन लादेन हे त्याचे वडिल. त्यांच्या 50 अपत्यांपैकी एक ओसामा.

- 17 व्या वर्षी सिरीयामधील नातेवाईकाच्या मुलीसोबतओसामाचं लग्न झालं. त्यानंतर ओसामाचे 5 लग्न झाली. पाच पत्नींपासून त्याला 23 मुलं झालेत.

- ओसामाने सिव्हील इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतली.

- 1979 मध्ये तो रशियाच्या अफगाण आक्रमणाविरुध्द लढण्यासाठी पाकिस्तानमध्ये निघून गेला. तिथे त्यांनी रशियन आक्रमणाविरुध्द लढण्यासाठी मोठा फंड गोळा केला.

- 1988 मध्ये त्याचा भाऊ सलेम विमान दुर्घटनेत ठार झाला. त्यानंतर ओसामाच जीवन बदललं. तो मूलतत्ववादी झाला.

- 1990 ओसामाने सौदी अरेबियात अमेरिकन सैन्य तळाविरुध्द आवाज उठवला. सौदी सरकारने ओसामाच नागरिकत्व रद्द केलं. तो सुदानला गेला.

- 1998 मध्ये पूर्व आफ्रिकन देश केनिया आणि टांझानियामधील अमेरिकन वकिलातीवर अल – कैदाने हल्ला केला. त्यात 224 जण ठार झालेत.

-1999 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार येताच आपला तळ अफगाणिस्तानमध्ये हलवला.

- ऑक्टोबर 2000 मध्ये येमेन मध्ये यूएसएस कोल युध्दनौकेवर आत्मघाती हल्ला घडवला. यात 17 अमेरिकन सैनीक ठार झालेत.

- 2001 लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्तान तोरा बोरा इथल्या डोंगरदर्‍यात मिसाईलद्वारे हल्ला केला. मात्र त्यात तो बचावला.

– 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेत मोठा आत्मघाती हल्ला लादेननं यशस्वी केला. विमान हायजॅक करुन ती वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवर धडकवण्यात आली. यात 3000 अमेरिकन नागरिक ठार झाले. त्यानंतर 250 कोटी रुपयाचे (25 मिलीयन डॉलर) बक्षीस त्याच्या शिरावर ठेवण्यात आलं. या हल्याची मोठी किंमत तालिबानला चुकवावी लागली. तालिबानी सत्तेतून हटवण्यात आलं. अफगाणिस्तानमधून अमेरिकेन लादेनला पकडण्यासाठी सर्वात मोठी मोहीम आखली. पाकच्या मदत घेण्यात आली.

आजपर्यंत ओसामा बिन लादेननं 60 पेक्षा जास्त व्हिडिओ ऑडियो मेसेज विविध चॅनेलवरुन प्रसारीत/ जारी केले गेले आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2013 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close