S M L

कॅनडाच्या पंतप्रधानांनी केली 'स्वामी नारायण' मंदिरात पूजा

पण ही पूजा खास ठरली कारण ट्रुडेव यांनी पूजाही भारतीय पोशाखातच केली.

Sonali Deshpande | Updated On: Jul 24, 2017 08:04 PM IST

कॅनडाच्या पंतप्रधानांनी केली 'स्वामी नारायण' मंदिरात पूजा

24 जुलै: टोरोन्टोमध्ये स्वामी नारायण मंदिराच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त कॅनेडाचे पंतप्रधान 'जस्टीन ट्रुडेव' यांनी पूजा केली आहे. पण ही पूजा खास ठरली कारण ट्रुडेव यांनी पूजाही भारतीय पोशाखातच केली.

'बी.ए.पी.एस.'चं हे मंदिर टोरोन्टोमधील एक भव्य दिव्य मंदिर आहे. या मंदिरात पूजा करण्यासोबतच स्वामी नारायणांच्या मुर्तीवर पाण्याचा अभिषेकही केला. यावेळी भारताचे कॅनडातले अँम्बासेडर आणि भारतीय विदेश मंत्रालयाचे माजी प्रवक्ते विकास स्वरूपही उपस्थित होते.

कॅनेडाच्या पंतप्रधानांनी फक्त पूजाच केली नाही तर ही बातमी ट्विटरवर शेअरही केली. ट्विटरवर शेअर करताना 'बी.ए.पी.एसचं मंदिर शिल्पकलेचा फक्त एक उत्कृष्ट नमुनाच नाही तर त्याचसोबत एक सामुदायिक जागाही आहे' असं म्हटलं आहे. तसंच 10व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 08:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close