S M L

मॅंचेस्टरमध्ये अरेना ग्रॅंडच्या कॉन्सर्टदरम्यान बॉम्बस्फोट; 19 ठार, 50 जण जखमी

Samruddha Bhambure | Updated On: May 23, 2017 09:32 AM IST

मॅंचेस्टरमध्ये अरेना ग्रॅंडच्या कॉन्सर्टदरम्यान बॉम्बस्फोट; 19 ठार, 50 जण जखमी

23 मे : इंग्लडमधील मँचेस्टर एरिनामध्ये काल (सोमवारी) रात्री पॉप गायक अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या दोन स्फोटात सुमारे 19 जण ठार तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा आत्मघातकी हल्ला असण्याची शक्यता तिथल्या पोलिसांनी वर्तवली आहे.

या हल्ल्यानंतर मॅंचेस्टर शहरात नाकाबंदी करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सर्व परिसरात तपासणी सुरू केली आहे. तसंच, जागोजागी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मॅन्चेस्टर एरिना सभागृहात एक कॉन्सर्ट सुरु होतं. या कॉन्सर्टमधील गायिका अरियाना ग्रँड यांचं शेवटचं गाणं सुरु असताना हे स्फोट झाले. यात  यात 20 जणांचा मृत्यू झाला. तर स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर लोकं सैरावैरा पळायला लागले. त्यातही अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तर गायिका अरियाना सुरक्षित असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या हल्ल्यासंदर्भातला एक व्हिडिओ शेआर केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केला असून या हल्ल्यात मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच, जखमींसाठी मी प्रार्थना करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2017 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close